ठाणे: नाशिकनंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अंधश्रद्धेला खतपाणी राजकीय मंडळीसह पोलीस अधिकारी घालत असल्याचा प्रताप समोर आला आहे. ‘पमी गुरू’ नावाच्या तृतीयपंथी गुरूचे अजब दावे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंगावर करोडो रुपयांचे सोनं घालून, महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत ‘पमी गुरू’ रील्स बनवत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.(Janta Police News)
खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा गुरूला भेटायला आल्याचा व्हिडिओ
नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणानंतर आता कल्याण परिसरात ‘पमी गुरू’ नावाच्या व्यक्तीचे व्हिडिओ चर्चेत आले आहेत. मुलं होत नाहीत, नोकरीत कुटुंबात वाद या समस्येमुळे अनेक सुशिक्षित महिला महाराष्ट्रातून या पमी गुरूकडे येतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मुलं जन्माला आली असा दावा या व्हिडिओंमध्ये करण्यात आला आहे.धक्कादायक बाब म्हणजे या गुरूला भेटण्यासाठी पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय मंडळी देखील येत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे देखील या गुरूला भेटायला आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पमी गुरू सोशल मीडियावर करोडो रुपयांचे सोने, महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत रील्स बनवत असल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.(Thane Crime News) पमी गुरुची कोणीही तक्रार करत नाही त्याच्यापुढे स्थानिक पोलीस नतमस्तक आहेत, अशी परिसरात चर्चा आहे.
सर्व गाड्या 7
फॉर्च्युनर कार ४
थार-३
त्याचबरोबर पमी गुरुकडे मोठ्या प्रमाणावर सोनंही असल्याचे फोटो, रिल मधून दिसून येत आहे.

Post a Comment
0 Comments